मुंबई

सिंगर प्रीतमच्या स्टुडिओतून 40 लाखांची चोरी करणाऱ्याला अटक, 15 दिवस पोलिसांची दिशाभूल

मुंबई पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुमारे 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा पाठलाग करत जम्मू गाठले. जिथे त्याच्या पत्नीच्या मोबाईलवरून आरोपीचे लोकेशन सापडले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

मुंबई :- बॉलीवूडचे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओतून 40 लाख रुपयांची चोरी करून फरार झालेल्या आरोपीला मालाड पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने जम्मू काश्मीर मधून अटक केली आहे.याप्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपींकडून 36 लाखांची रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल आयफोन जप्त केला आहे.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नोकर असून मागील चार वर्षांपासून म्युझिक डायरेक्टर प्रीतम यांच्याकडे कामाला होता.

वास्तविक नोकराला संगीताची आवड होती. त्याला संगीत दिग्दर्शक व्हायचे होते पण मालकाने त्याला नोकर म्हणून ठेवले. त्यामुळे मालकाचा बदला घेण्यासाठी त्याने स्टुडिओत ठेवलेले लाखो रुपये चोरून पळ काढला.मालाड पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी आशिष श्याल (32 वय) याने चोरीनंतर मोबाईल रस्त्यावर फेकून दिला आणि नोटांनी भरलेली बॅग हवालाद्वारे जम्मू-काश्मीरला पाठवली. यानंतर तो स्वत: ट्रेनने जम्मूला पोहोचला.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुमारे 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. चोरीनंतर आरोपींनी अनेक रिक्षा बदलल्या. त्याने आधी कांदिवली येथे ऑटो पकडला, नंतर पायी चालत मार्वे रोडवरून दुसरा ऑटो पकडला.यानंतर आरोपींनी मालवणी, चारकोप आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेकडे ऑटो बदलून प्रवास केला. रात्रभर आरोपी ऑटो बदलून पायी जात होता, त्यामुळे त्याला पकडणे कठीण होत होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा पाठलाग करत जम्मू गाठले.मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा पाठलाग करत जम्मू गाठले. जिथे पत्नीच्या मोबाईलवरून त्याचे लोकेशन सापडले, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0