IAS Transfer : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका…राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Maharashtra IAS Transfer List : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाचा राजेश देशमुखांकडे सचिवपदाचा अतिरिक्त पदभार,विजय सूर्यवंशींकडे कोकणचा पदभार
मुंबई :- राज्यातील पुन्हा एकदा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. IAS Transfer List महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका चालूच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या Ajit Pawar कार्यालय सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी IAS Vijay Suryavanshi यांची बदली कोकण विभागाचे विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांची बदली?
1.डॉ. विजय सूर्यवंशी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2.डॉ. राजेश देशमुख विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
3.नयना गुंडे आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची, महिला व बाल आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4.विमला आर. राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई यांची निवासी आयुक्त आणि सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
5.सिद्धराम सलीमठ जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6.मिलिंदकुमार साळवे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
7.डॉ. सचिन ओंबासे जिल्हाधिकारी, धाराशिव यांची सोलापूर महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8.लीना बनसोड व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांची आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9.राहुल कुमार मीना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली, आणि सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे


