Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांची दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट

Supriya Sule Meet Santosh Deshmukh Family : मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन मारेकऱ्यांना फाशी व्हावी याची मागणी करणार ; खासदार सुप्रिया सुळे
बीड :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग दिवंगत सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी भेट घेतली आहे. देशमुख कुटुंबीयांना सुप्रिया सुळे यांनी धीर देत म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची भेट घेऊन लवकरच मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबीयांना आणि मस्साजोग गावकऱ्यांना दिले आहे. तसेच, सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांनी घेतलेल्या अन्नत्यागाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी या भेटीदरम्यान केली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. कारण मंत्री धनंजय मुंडे यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड हे सूत्र जर असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी आतापर्यंत वाल्मीक कराडसह अनेक लोकांना अटक केली आहे. खून प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे आरोपी यंत्रणांना का सापडत नाही असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. खून प्रकरणाला अनेक कंगोरे असून घटनेची संबंधित सर्वांचे फोनचे सीडीआर मिळावे अशी आग्रही मागणी याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस करणार असल्याचे म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हणाले की, या घटनेतील मारीकरांना फाशी व्हावी यासाठी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालावा अशी मागणी केली आहे. तसेच खड्ड्याने मागणी हा मोठा असून या प्रकरणी ईडीसीबीआय या तपास संस्थेच्या माध्यमातून तपास करावा अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देशमुख कुटुंबीयांना शासनापर्यंत पोहोचता यावे यासाठी वेळ बघितली असून त्यांनी वेळ दिल्यानंतर भेटून गुन्हेगारांना कंट्रोल शासन अर्थात फाशी व्हावी यासाठी मागणी करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.