Thane Sex Racket : ठाण्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाला अटक, तरुणीची सुटका

Thane Police Take Action On Sex Racket : पोलिसांनी यशोधन नगर परिसरातील बालाजी हाईट्स येथे राहणाऱ्या दलालावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
ठाणे :- शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत सातत्याने वाढत आहे.Thane Crime News पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाई करत दलाला अटक केली असून, असहाय्य महिलेची सुटका केली आहे. Thane Sex Racket तसेच काही पीडित तरुणींची ही पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी हाइट्स येथील एका घरात एका पुरुषाकडून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची बातमी मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दलाल पुरुषाला अटक केली. दत्ताराम सीताराम सावंत (58 वय) असे अटक करण्यात आलेल्या दलाल पुरुषाचे नाव आहे. गरजू आणि असहाय्य महिलांना फुस लावून स्वतःच्या घरात वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी दलाल याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, धनाजी क्षिरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक वालगुडे, दिपक भोसले, पोलीस हवालदार किशोर पाटील, महिला पोलीस अंमलदार हर्षदा थोरात,भाग्यश्री पाटील, किरण चांदेकर, पोलीस शिपाई उदय घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.