
Rajan Salvi Joined Eknath Shinde Shivsena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठी हानी, कोकणातील दिग्गज नेता शिंदेच्या गळाला, मंत्री उदय सामंत, आमदार सामंत यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती शिवसेनेत प्रवेश
ठाणे :- शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून कोकणातील दिग्गज आणि मातोश्रीचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार राजन साळवी Rajan Salvi यांनी काल दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची संध्याकाळी भेट घेतली होती या भेटीच्या दरम्यान मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत उपस्थित होते.



राजन साळवी यांनी आज ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. आनंद आश्रमात धर्मवीर आनंद दिघे यांचे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते राजन साळवी यांना पक्षात प्रवेश दिला आहे. राजन साळवी यांनी हाती धनुष्यबाण घेत पक्षात प्रवेश करत गळ्यात शिवसेना शिंदे गटाची भगवी शाल घातली आहे.
राजन साळवी हे विधानसभेत पराभव झाल्यानंतर ते पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा चालू होत्या सुरुवातीला ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील अनेक शिवसेना ठाकरे गटाचे नेते पक्षात येणार असल्याचे बोले होते. ठाकरेचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून राज्यात ऑपरेशन टायगर सध्या चालू असल्याचे सामंत यांनी म्हटले होते