क्राईम न्यूज
Trending

Pune Crime News | १९ लाखांच्या मुद्देमालासह चोरट्याला गुजरात येथून बेड्या : विश्रांतवाडी तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी

  • तपास पथकाचे उपनि नितीन राठोड व पथकाकडून कौतुकास्पद कामगिरी | Pune Crime News

पुणे, दि. १३ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर
| Pune Crime News

विश्रांतवाडी Vishrantwadi हद्दीतून इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपोसह चोरीस गेलेला तब्बल १९ लाख रुपयांचा मुद्देमाल गुजरात राज्यातून हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे उपनि नितीन राठोड PSI Nitin Rathod व पथकाकडून भरूच Bharuch (गुजरात) Gujrat येथून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

याप्रकरणी आरोपी प्रशांत दिगंबर पाटील रा. औरंगाबाद यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो विश्रांतवाडी हद्दीतून चोरीस गेला होता. याबाबत गुन्हा रजि. नंबर २३/२०२५, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२) या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना पोहवा ७३२२ भोसले, पोहवा ७४३५ संजय बादरे, व पो.शि.२६८२ अक्षय चपटे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा आरोपी प्रशांत दिगंबर पाटील रा. औरंगाबाद याने केला असून तो गुन्हयात चोरलेला माल घेऊन विकण्यासाठी भरुच गुजरात या ठिकाणी गेला आहे.

मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे पोउनि नितीन राठोड, पोहवा ७३२२ भोसले, पोहवा ७४३५ संजय बादरे, व पोहवा. २८५७ यशवंत किर्वे यांनी भरुच गुजरात या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलीसांची मदतीने आरोपीचा शोध घेऊन मोठ्या शिताफीने आरोपीस गुन्हयात चोरीस गेलेले महिंद्रा पिकअप नं. MH.12.LT.5119 व त्यामध्ये असलेले इलेक्ट्रीक साहित्यासह पकडून त्याचेकडून २,५०,०००/-रु. किंमतीचा महिंद्रा पिकअप टेंपो नंबर MH.12.LT.5119 व त्यामध्ये असलेले १६,१९,४१७/- रु. किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य असा एकून १८,६९,४१७/-रु.चा माल केला हस्तगत केला.

सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, विठ्ठल दबडे सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, मंगेश हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे. Pune Police

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0