मुंबई
Trending

Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाला कोकणात खिंडार.. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’!

Rajan Salavi Joined Shinde Group : शिवसेना ठाकरे गटाचे बाजी आमदार आलेले येथे राजन साळवे यांनी उपनते पदाचा दिला राजीनामा

मुंबई :- विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गट कुठेतरी सावरत असताना पुन्हा एकदा ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत ओळखले जाणारे कोकणातले नेते राजन साळवी Rajan Salavi यांनी पक्षातील उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी यांच्या पराभवानंतर ते लवकरच भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार होते अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. तसेच राजन साळवी हे गुरुवारी दुपारी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे सध्या बोलले जात आहे. विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादा नंतर उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत त्यांची बाजू समजून घेतल्याने राजन साळवी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

राजन साळवी यांच्या उपनेते पदाच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जे पक्षात येतील त्यांचे स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिधेंच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक तसेच अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे आम्ही जे काम केले ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारे सरकार आहे घरी बसणारे नाही. हे रिजल्ट देणारे सरकार आहे फील्डमध्ये उतरून 24X7 काम करणारे सरकार आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री काळात एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प आम्ही सुरू केले, कल्याणकारी योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले. विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे आमचे सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेत अनेक नेते येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

राजन साळवी कोण?

राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत. रत्नागिरीतील राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते खंदे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. तेव्हा साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं. विद्यार्थीसेनेपासून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम सुरु केलं. राजन साळवी हे शिवसेनेचे रत्नागिरीतील पहिले नगराध्यक्ष आहेत. 2009, 2014, 2019 सलग तीनवेळा ते राजपूरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0