क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police News : मुंबई पोलिसांची विशेष मोहीम अंतर्गत मोठी कारवाई उत्तर प्रदेशातमधून 10 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

Mumbai Police seized worth 10 crore drugs :,पोलिसांच्या कारवाई 24 तासात दहा आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे

मुंबई :- शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत साकीनाका पोलिसांनी Sakinaka Police लखनऊमध्ये जाऊन एमडी ड्रगवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 5 किलो 500 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या अंमली पदार्थाचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव हा 10 कोटी रुपये आहे. पोलिसांनी या विशेष मोहिमेअंतर्गत 24 तासात दहा गुन्हेगारांना अंमली पदार्थ बाळाल्या प्रकरणी अटक केली आहे.

बृहन्मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कार्यवाही करण्याकरीता पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे सूचनेनुसार, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुंबई शहरातील पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळीय पोलीरा उप आयुक्त तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार हे एकत्रित मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही करीत आहेत.7 आरोपी हे गांजा,1 हेरॉईन, 1 Nitrazepam Tablet IP 10 mg असे एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.मोहिमेअंतर्गत मागील 24 तासांमध्ये चेंबुर, देवनार, पार्कसाईट, खेरवाडी, ओशिवरा, साकीनाका, मालवणी, दिंडोशी पोलीस ठाणे अंतर्गत अंमलीपदार्थ कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

अंमली पदार्थ विरोधी कारवाईमध्ये बाळगणे चे एकूण 113 गुन्हे दाखल करण्यात आले असून सेवन करणे (Consumption) चे एकुण 465 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच दाखल गुन्हयांमध्ये अंदाजे रू. 16 कोटी 94 लाख 03 हजार 925 किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा एकुण 81.724 कि.ग्रॅ. एवढा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. यावर्षी मुंबई पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकुण 563 गुन्हे दाखल करुन 532 आरोपींना अटक केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0