Dombivli Crime News : कल्याण-डोंबिवली परिमंडळ-3 हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणारे गजाआड ; गांजा, चरस, एमडी लाखो अंमली पदार्थ जप्त!

•अंमली पदार्थ विक्री प्रकरणात परिमंडळ-3 गुन्हे शाखेच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने 4 जणांना अटक केली. कल्याण डोंबिवली परिसरात ही कारवाई करण्यात आली.
डोंबिवली :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ-3 कार्यक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याकरिता पोलिसांकडून विशेष पथक स्थापन करून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले होते. पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण आणि पथकाने संयुक्तरित्या मानपाडा बाजारपेठ आणि डोंबिवली पोलीस ठाणे परिसरात केलेल्या कारवाईत गांजा, चरस, एमडी हा अमली पदार्थ तस्करी करणारे तसेच जवळ बाळगणाऱ्या चार आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे.

पोलिसांनी केलेले कारवाई
1.मानपाडा पोलीस स्टेशन हददीत सुदर्शन मार्बल समोर, सावित्रीबाई फुले नाटयगृह जवळ, एम.आय.डी.सी. रोड, डोंबिवली पूर्व येथे एक सनिल श्रीनाथ यादव, (वय 25 वर्ष रा.आनंद बंगलो डोंबिवली पुर्व) हा त्यांचे ताब्यात एकुण 8.48 ग्रॅम वजनाचा 16 हजार 500 रूपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगल्या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम 8 (क), 21 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2.बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हददीत दुर्गामाता चौक,भटेला तलाव येथील मोकळया जागेत, कल्याण पुर्व येथे शंकर महादेव गिरी, (वय 46, रा.ता. आष्टी, जि. बीड) हा त्यांचे ताब्यात एकुण 9 किलो 950 ग्रॅम वजनाचा 1 लाख रूपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळलेला मिळुन आल्याने त्याचेवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क), 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3.डोंबिवली पोलीस स्टेशन हददीत राजाजी पथ, स्वामी नारायण मंदिरा बाजुस असलेल्या मोकळया जागेत, रामनगर, डोंबिवली पुर्व येथे सचिन एकनाथ कावळे, (वय 32, रा. प्रगती कॉलेज जवळ डी.एन.सी. रोड डोंबिवली पुर्व),अमन विरेंद्र गुप्ता उर्फ पप्पु, (वय 16, रा. दत्तनगर, डोंबिवली पूर्व) यांनी मिळून त्यांचे ताब्यात एकुण 23.53 ग्रॅम वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ व 10 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एकुण 93 हजार 943 रूपये किंमतीचा अंमली पदार्थ विक्री करीता सोबत बाळगल्याचे मिळून आल्याने त्याचेवर डोंबिवली पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिमंडळ 3 कल्याण मध्ये 1 जानेवारी 2025 ते आजपर्यंत केलेल्या विशेष अंमली पदार्थ कारवाई पथकामार्फत अंतर्गत एकुण 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून 19 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचेकडुन 63 ग्रॅम एम. डी. पावडर, 232 कोडीनयुक्त बॉटल व नशेच्या गोळया तसेच 47 किलो 044 ग्रॅम वजनाचा गांजा असा एकुण 12 लाखापेक्षा जास्त रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे,पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव यांचे आदेशाने, अतुल उत्तमराव झेंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 कल्याण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक शांताराम कसबे, पोशि गौतम जाधव, पोलीस शिपाई राजेंद्र सोनावणे यांच्या विशेष पथक तसेच डोंबिवली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावदवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोकरे, मानपाडा पोलीस निरीक्षक गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राळेभात व बाजारपेठ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक ढुकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांचेकडुन कामगिरी करण्यात आली आहे.