ठाणेमुंबई

Thane Water Supply Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी,ठाण्यात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद!

Thane BMC Cut Water Supply : एमआयडीसीच्या जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी येणार नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

ठाणे :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जलवाहिनीवर तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ठाण्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. Thane Water Supply Cut News ठाण्याच्या ठराविक भागांमध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढचे काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल अशी माहिती समोर आली आहे.

बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे. यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांमध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेद्वारे घेण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने पाणी पुरवठा बंद असणार आहे.

कळवा, दिवा आणि मुंब्रा या तीन भागांमध्ये उद्या गुरुवार 6 फेब्रुवारी 2025 मध्यरात्री 12.00 वाजल्यापासून ते परवा शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 मध्यरात्री 12.00 वाजेपर्यत असा 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0