Pune Anti Corruption Bureau News : पुण्यात जीएसटी निरीक्षकाला लाच प्रकरणी अटक
Pune Anti Corruption Bureau Arrested GST Officer : पुण्यात वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले
पुणे :- व्यापाराचा जीएसटी नंबर (GST) पुर्नजिवीत करून सुरू करून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू व सेवा कर कार्यालयातील करनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले. Pune Anti Corruption Bureau Arrested GST Officer याप्रकरणी करनिरीक्षक तुषारकुमार दत्तात्रय माळी (वय 33) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वस्तू व सेवा कर कार्यालयातील कर निरीक्षक तक्रारदाराचे जीएसटी नंबर जीएसटी कार्यालयाकडून बंद करण्यात आले होते. हे जीएसटी नंबर पुर्नजिवीत करून पुन्हा चालू करण्यासाठी कर निरीक्षक तुषार कुमार माळी यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली.त्यानंतर येरवडा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना तुषारकुमार माळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.