Vasai Drug Racket : कोकेन विक्री करताना परदेशी नागरिक जेरबंद ; सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात 26 लाखांचे ड्रग्ज जप्त
Vasai Crime Branch Seized 26 Lakh Drug : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकाला पकडले असून पोलिसांनी आरोपीकडून 1 किलो 49.7 ग्रॅम वजनाचा इफेड्रीन (नियंत्रीत पदार्थ) व 17.3 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केले आहे
वसई :- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अगरवाल नाका विजय लक्ष्मी नगर परिसरातून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकाला पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल 20 लाख 99 हजार 400 रुपये किमतीचे 1 किलो 49.7 ग्रॅम वजनाचा इफेड्रीन आणि 5.19 लाखांचे 17.3 ग्रॅम वजनाचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. Vasai Crime Branch Seized 26 Lakh Drug अलबर्ट कोपी ओपोकु, (मूळ देश घाना) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात आचोळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, यांना रोजी नायगांव, वालीव, आचोळे, नालासोपारा, वसई, तुळींज परिसरात गस्त करुन अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांचे एक पथक वसई (पूर्व), परिसरात गस्त करीत असताना सोमेश्वर महादेव मंदिर, अग्रवाल नाका, विजयलक्ष्मी नगर, वसई (पूर्व) या ठिकाणी एक नायजेरियन संशयितरित्या आढळून आला होता. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 किलो 49.7 ग्रॅम वजनाचा इफेड्रीन आणि 5.19 लाखांचे 17.3 ग्रॅम वजनाचे कोकेन आढळून आले आहे. तसेच त्याच्याकडे भारतात वास्तव्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसून बेकायदेशीर भारतात वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात अवैध भारतात राहण्या प्रकरणे विदेशी नागरिक अधिनियमन आणि एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आचोळे पोलिसांच्या ताब्यात दिली असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक, सचिन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, निखील चव्हाण, पाठक, पोलीस हवालदार इंगळे, टक्के,पाटील, कुडवे, आव्हाड, पागधरे,यादव, महिला पोलीस हवालदार लतादेवी एक्कलदेवी व पोलीस शिपाई डोखळे यांनी केली आहे.