Mumbai BMC Budget 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, मुंबईच्या विकासासाठी कोणत्या विभागाला किती कोटी?
Mumbai BMC Budget 2025-26 Latest News : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी एकूण 74,427. 41 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिकेच्या अर्थसंकल्पनात 14.19 टक्क्यांनी वाढ
मुंबई :- देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. Mumbai BMC Budget 2025 बीएमसीने 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवारी (4 फेब्रुवारी) सादर केला. यावेळी एकूण 74,427. 41 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या 65180.79 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 14.19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.मुंबईच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी 43,162 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने हा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सादर केला आहे.
कोणत्या विभागाला किती कोटी रुपये मिळाले?
- कोस्टल रोड प्रकल्पासाठी 5807 कोटी रु
- सीवरेज ट्रीटमेंट प्लांटसाठी 5545 कोटी रुपये
- रस्त्यासाठी 5100 कोटी रु
- पाणीपुरवठ्यासाठी 5400 कोटी रु
- आरोग्य सेवांसाठी 2172 कोटी रु
- पुलाच्या बांधकामासाठी 1980 कोटी रु.
- घनकचरा व्यवस्थापनासाठी 499 कोटी रु
- शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 411 कोटी रु
2025-26 या वर्षासाठी पर्यावरण विभागासाठी 113.18 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मुंबई हवामान कृती आराखड्यांतर्गत ऊर्जा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, हरित कव्हर, हवेची गुणवत्ता आणि जलसंपत्ती व्यवस्थापनावर लक्ष देण्यात आले आहे.ग्रीन बजेट बुक जारी करणारे मुंबई हे जगातील चौथे शहर आहे, ज्यामध्ये 32% भांडवली बजेट क्लायमेट ॲक्शन प्लॅन अंतर्गत येते.