Thane Illegal Work : लोकमान्य-सावरकरनगर येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा बुलडोजर कधी?

TMC Will Take Action Against Illegal Building Work In Lokmanya Savarkar Nagar Thane : लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, म्हाडाची बघ्याची भूमिका?
ठाणे :- ठाण्यात जागा मिळेल तिकडे बेकायदा बांधकामे होत असून Thane Illegal Building Work याला ‘अ’भय असल्याशिवाय शक्य नाही. काही भ्रष्ट अधिकारी व नेत्यांमुळे बेकायदा इमले उभे राहत असून भू माफियांच्या मनात भय राहिलेले नाही. असा प्रकार ठाण्यात उघडकीस झाला आहे. ठाण्याच्या लोकमान्य सावरकर नगर येथील प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. Illegal Building Work In Lokmanya Savarkar Nagar Thane तसेच ही जागा म्हाडाच्या मालकीच्या असून सुद्धा म्हाडाकडून याकडे केवळ बघ्याची भूमिका पाहायला मिळत आहे.
शिवप्रहार कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विवेक वसंत जाधव Vivek Vasant Jadhav, Vice President of Shiv Prahar Workers’ Association यांनी आई माता मंदिरा जवळ शाहू स्मृती इमारतीच्या बाजूला सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेला तसेच सहाय्यक आयुक्त लोकमान्य-सावरकरनगर यांना त्या संदर्भातील पत्रव्यवहार केले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या टेबलावर पैशांच्या जोरामुळे कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. म्हाडाच्या मालकीचे कारणे सांगून या कारवाईबाबत केवळ म्हाडाकडे बोट दाखवले जाते. अधिकारी वर्ग एकमेकांना संगणमत करून या अनधिकृत बांधकामातून मोठा मलिदा गोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, या अनधिकृत बांधकामावर अद्यापही कारवाई होत नाही प्रशासनाचे डोळे उघडतही नाही. अशी परिस्थिती सध्या ठाण्यात दिसून येत आहे.