Mira Bhayandar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी सेनेच्या पदाधिकाऱ्याला व्यापार्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

Navghar Police Arrested MNS Leader Chandrasekhar Jadhav In Extortion Money : महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी चंद्रशेखर रवींद्र जाधव यांना नवघर पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केली आहे
भाईंदर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी वरळी मध्ये जाहीर सभेत पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे. परंतु भाईंदर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी चंद्रशेखर रवींद्र जाधव Mira Bhayandar MNS Member Chandrashekhar Jadhav Arrested In Extortion यांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. व्यापाराकडे 20 हजार रुपयांची खंडणी प्रकरणी जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक परिसरात व्यापार करणारे लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि सभासद होण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून जर व्यापाऱ्यांनी कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सदस्य न झाल्यास प्रति महिना प्रत्येक व्यापाऱ्यांकडून वीस हजार रुपये द्यावे लागेल अन्यथा औद्योगिक कारखाने बंद करून टाकू अशी धमकी दिली होती. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 308(2), 308(2), 351(2), 6 (5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01, विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे तपास करीत आहे.