क्राईम न्यूजमुंबई

Nalasopra Drug News : नालासोपारा ड्रग्ज विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला सापळा रचून अटक; 12 लाखांचा साठा जप्त

Nalasopra Police Arrested Nigirian Man In Drug Selling : नालासोपारातील तुळींज परिसरात सेंट्रल पार्क येथे एक व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मीरा भाईंदर नगर वसई विरारचे आमले पदार्थ विरोधी पक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी शाखेने परिसरात सापळा रचला.

नालासोपारा :- नालासोपारा येथील तुळींज परिसरातील सेंट्रल पार्क जवळ मोफेड्रोन पावडर (एम.डी.) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मीरा-भाईंदर वसई विरार यांनी अटक केली आहे. Vasai Virar Police या नायजेरियन व्यक्तीकडून पोलिसांनी 12 लाख किंमतीचे अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केले आहे. Nalasopra Drug Trap अंमली पदार्थ त्याने विक्रीसाठी आणला असल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झालेली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक नायगाव, वालीव, वसई, परिसरात गस्त करुन नालासोपारा, तुळींज परिसरात गस्त करीत असताना सेंट्रल पार्क बाजुकडून नालासोपारा पूर्व-पश्चिम उड्डाणपुल बाजुकडे जात असताना 29 जानेवारीच्या मध्यरात्री साईबाजार येथील साई छाया बिल्डींग समोर रोडलगत एक दक्षिण आफ्रिका वंशाचा इसम दुचाकी गाडीवर बसुन कोणाची तरी वाट पाहत असल्याचे पोलिसांना दिसले. तसेच त्याची हालचाल संशयास्पद वाटत असल्याने त्याचेकडे कोणतातरी अंमली पदार्थ असल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे.

नायजेरीयन जॉनसर वॉकर, (वय 4210 फीट रोड, नालासोपारा (पूर्व), मुळ रा. लागोस, देश नायजेरीया) याची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात 62.3 ग्रॅम वजनाचा 12 लाख किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार आरोपीच्या विरोधात तुळींज पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास तुळींज पोलीस करत आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक, सचिन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, निखील चव्हाण, पोलीस हवालदार टक्के,पाटील,कूड़ये,आव्हाड, पागधरे, यादव पोलीस शिपाई डोखळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0