ठाणेमुंबई
Trending

Thane Police News : राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडून सत्कार आणि अभिनंदन!

Thane Police CP Ashutosh Dumbare Congratulate Thane Two Police Officer For Medal : उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले आहे

ठाणे :- ठाणे शहर पोलीस Thane Police आयुक्तालयात कार्यान्वित असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बाबत 76 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती यांच्याकडून पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांच्याकडून राष्ट्रपती पदक विजेते सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसोजा आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव गोविंद काळे यांना जाहीर करण्यात आले आहे.

सहायक पोलीस आयुक्त ममता डिसोजा यांची कामगिरी

सहायक पोलीस आयुक्त ममता डिसोजा,विशेष शाखा, ठाणे शहर यांची पोलीस दलात 34 वर्ष सेवा झाली असुन त्या 1990 साली पोलीस उप निरीक्षक या पदावर पोलीस दलात रूजु झाल्या होत्या. त्यांच्या सेवेच्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांना 295 बक्षिसे, प्रशस्तिपत्रक देवुन गौरविण्यात आले असुन त्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सन्मानचिन्हाने देखील गौरविण्यात आलेले आहे. त्या कामोठे पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना 2 वर्षे 9 महिने वयाच्या मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या गुन्हयाचा त्यांनी उत्कृष्ठ तपास करून भौतिक पुरावे गोळा करून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गुन्हयाच्या सर्वोत्कृष्ठ तपासाबाबत त्यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचेकडुनही गौरविण्यात आले आहे.

पोलीस उप निरीक्षक महादेव गोविंद काळे यांनी दहशतवाद्यांना अटकाव केला

पोलीस उप निरीक्षक/महादेव गोविंद काळे, विशेष शाखा, ठाणे शहर हे 1988 मध्ये पोलीस शिपाई या पदावर पोलीस दलात रूजू झाले होते. त्यांच्या 37 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत्त्या कालावधीत त्यांना 190 बक्षिसे, प्रशस्तिपत्रक देवुन गौरविण्यात आले असुन त्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सन्मानचिन्हाने देखील गौरविण्यात आलेले आहे. तसेच सन 2000 मध्ये गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे शहर येथे कर्तव्यास असताना हिजबुल या दशहतवादी संघटनेचे 4 अतिरेकी हे मुंब्रा परिसरात मोठा घातपात करण्यासाठी शस्त्रासह लपले असल्याची माहिती काढून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0