Sanjay Raut : देशाच्या न्यायची अपेक्षा ठेवता येत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल
•भविष्यात वाल्मीक कराड भाजपाच्या गोटात जातील, खासदार संजय राऊत यांचे भाकित
मुंबई :- खासदार संजय राऊत यांनी आमदार अपात्रतेबाबत बोलताना म्हणाले की, आमच्यावर दबाव येतोय हे न्यायमूर्तींनी सांगितले त्यामुळे देशात न्यायची अपेक्षा ठेवायची कोणाकडे असा सवाल यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, वाल्मीक कराड प्रकरणावरूनही संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत भविष्यात वाल्मीक कराड पूर्ण राजकारणात येतील आणि त्यावेळी ते भाजपाच्या गटात सामील होतील असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, बीड प्रकरणामधून आधीपासूनच आंदोलन सुरू होते. अंजली दमानिया त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली म्हणून काही होणार नाही. लोक पुन्हा प्रस्ताव उतरतील भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड दहशतीवरून तांडव करत आहे परंतु सध्या सर्व शासकीय आशीर्वादाशिवय होऊ शकत नाही असे संजय राऊत म्हणाले आहे. वाल्मीक कराड हे रुग्णालयात आहे. त्यांचे काय दुखत आहे मला माहित नाही. वाल्मीक कराड यांच्यासाठी रुग्णालयाचा संपूर्ण पहिला मजला रिकामा करण्यात आला आहे. त्यांना सर्व सुख सुविधा पुरवल्या जातात हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिसत नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
हे सर्व मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने चालल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. सुरेश धस यांचे ऐकले पाहिजे. आम्ही मुंबईतून बोलणे ते योग्य नाही सुरेश धस हे स्थानिक आमदार असून त्यांना या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती आहे. तसेच भविष्यात वाल्मीक कराड हे भाजपाच्या गोटात सामील होतील असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
आमदार अपात्रच्या बाबत सर्जेराव म्हणाले की अपात्रतेच्या संदर्भात निकाल अपेक्षित होता. संविधान आणि घटनेनुसार आम्हाला न्याय मिळाले असे वाटत असताना ज्या आमदारांनी पक्षांतर केले ते अपात्र ठरतील. परंतु घटना बाहेर सरकारला सुप्रीम कोर्टाने दणका देईल. पण न्यायच्या बाबतीत देशात अपेक्षा ठेवता येत नाही आजच सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकरे यांनी सांगितले की देशात सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. मग आम्हाला न्याय कोणाकडून मिळणार असा सवाल संजय राऊत त्यांनी उपस्थित केला आहे.