Nalasopra Robbery News : शर्टने भरलेला टेम्पो, चोरीप्रकरणी एका आरोपींना अटक
Nalasopra Pelhar Police Arrested Robbers : शर्ट व टेम्पो चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. यामधील आरोपींसह चोरीस गेलेला 4.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
नालासोपारा :- पेल्हार पोलीस ठाणे Pelhar Police Station क्षेत्रातील खान कंम्पाउंड येथून शर्ट भरलेले कंटेनर व टेम्पो चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. यामधील आरोपींसह चोरीस गेलेला 4 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हुसैन बसारत उल्ला, ( वय 22 रा. हाजमी नगर, मालवणी 7. मालाड, मुंबई मुळगाव रा.उत्तरप्रदेश) टेम्पो लंपास करणाऱ्या चोरट्यांची नावे आहेत.
पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी रात्रीच्या दरम्यान संध्या पॉवर लॉन्ड्री ॲण्ड ड्रायर्स कंपनी, खान कम्पाउंड, पेल्हार, नालासोपारा पूर्व येथे गुन्हयातील फिर्यादी रामबहादुर राजाराम गुप्ता, (वय 47 रा.धोवीघाट, मुंबई ) यांचे कंपनीचा टाटा मोटर्स कंपनीचा टेम्पो क्रमांक त्यामध्ये एकूण 179 रेडीमेड शर्ट असे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने टेम्पों व शर्ट असा एकूण 4 लाख 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करुन चोरी केल्याची तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीस गेलेल्या टेम्पोचा पाठलाग करून पोलिसांनी आरोपी हुसैन उल्ला याला मालवणी येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेले सर्व शर्ट आणि टेम्पो असा चार लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असून आरोपीचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3. विरार,बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दुर्गा चौधरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, वसिम शेख, पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.