Sharad Pawar Health Update News : डॉक्टरांनी शरद पवार यांना चार दिवसांची विश्रांती घेण्याचा दिला सल्ला
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांची प्रकृती खालावल्याने सर्व नियोजित दौरे रद्द केल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार हे पुण्यात असून पुढील चार दिवसाच्या सर्व दौरे रद्द केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. डॉक्टरांनी शरद पवार यांना चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे अशी माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभर कार्यकर्ते मेळावे व पक्ष उभारण्यासाठी पक्षांमध्ये नवचैतन्य उभारण्यासाठी मागील अडीच वर्षांपासून सतत राज्यभर दौरे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर राज्यात परिवर्तन करून महायुती सरकारला मोठा धक्का बसवत राज्यात महाविकास आघाडीचे अनेक खासदार निवडून आणले होते. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला आलेले घवघवीत यश आणि महाविकास आघाडीला आलेल्या अपयश यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. मागील अनेक दिवसांपासून शरद पवार हे सातत्याने राज्यभरातील विविध कार्यक्रमाला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसले होते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील आपल्या घरीच आराम करतील. त्यामुळे या कालावधीतील त्यांचे सर्वच पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. शरद पवार सध्या पुण्यात आहेत. ते लवकरच मुंबईतील आपल्या घरी परत येतील असे सांगितले जात आहेत. शरद पवार घशाचा संसर्ग व सर्दीने घेरल्याची माहिती आहे. 4 दिवस विश्रांती घेतल्यानंतर शरद पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती आहे.