Vasai Crime News : अपघाताचा बनाव करून खून प्रकरणी एका जणाला अटक
•दारू पिऊन शिवीगाळ,भांडण, धंद्यात आर्थिक नुकसान हाच राग मनात धरून डोक्यात लोखंडी रॉड घालून जखमी केले होते.
वसई :- खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी एका जणाला अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पोलिसांना यश आले आहे. पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि. 14 जानेवारी 2025 च्या दुपारच्या सुमारास वसई पूर्व, तुंगारेश्वर येथिल ब्रम्हा पेट्रोल पंप समोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 चे गुजरात मुंबई सर्विस रस्त्यावर प्रभुकुमार लुटन झा, (42 वय रा. नालासोपारा पूर्व),यास अज्ञात गाडीने ठोकर मारुन नमुद गुन्हयातील प्रभुकुमार लुटन झा,याचा मृत्यु झाल्याची फिर्यादी गगण धरमदेव झा, (वय 43, रा. नालासोपारा पूर्व,) यांनी दिली होती. पोलिसांनी बी.एन.एस कलम 106 (1),281,125 (ए), 125 (बी) सह मो.चा. कायदा कलम 184, 187 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकारण पथकातील अधिकारी अंमलदार यांना मयत यास ठोकर मारणाऱ्या वाहनाचा व अज्ञात चालकाचा शोध घेण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता असे समजले कि, मयत हा सनातन बिनय सिंह यांच्या क्रेनवर चालक म्हणून काम करत होता. मयत प्रभूकुमार झा याच्या सोबत सनातन बिनय सिंह याचे भांडण झाले होते. अशी गुप्त बातमीदारामार्फतीने माहिती प्राप्त झाली होती.त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सनातन बिनय सिंह, (वय 49, रा. वसई पूर्व) यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्हयातील मयत हा दारु पिऊन येऊन त्यास व त्यांच्या ऑफीसचे जवळच असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे इतर चालक यांना शिवीगाळ करीत होता. मयत याच्या मुळे त्याचे वेळोवेळी आर्थिक नुकसान झाले होते. त्याचा राग येऊन सनातन बिनय सिंह याने मयत याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. आरोपी सनातन बिनय सिंह, यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
पोलीस पथक मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शकिल शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे, अभिजित नेवारे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, वसिम शेख या सर्व पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.