क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Drugs News : गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तब्बल 42 किलो गांजा जप्त, चितळसर पोलिसांची कारवाई

Thane Police Arrested Ganja Seller : गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा चितळसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गांजा तस्करी करण्यासाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे :- ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन सुभाष नगर येथे स्विफ्ट डिझायर कार मधून तब्बल 42 किलो गांजा चितळसर पोलिसांनी जप्त केल्या असून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. Thane Police News पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. Thane Ganja Seller पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.रोहितकुमार विजयकुमार पटेल (24 वय),सिध्देश दत्तात्रय शिंदे (35 वय),सुदर्शन सखाराम वाणी (वय 26),राजेंश प्रभाकर लोखंडे, (वय 29) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी कशाप्रकारे कारवाई केली?

चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार पाटील पोलीस शिपाई साळुंखे यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना पोखरण रोड परिसरात एक स्विफ्ट डिझायर कंपनीची कार संशयितरित्या पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी या कार मधील दोन व्यक्तींना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले. पोलिसावलदार पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सांगळे व त्यांच्या टीमला घटनास्थळी बोलाविले. पोलिसांनी कार चालक असलेल्या रोहितकुमार पटेल यांची याची चौकशी केली तसेच त्याला कारची डिक्की उघडल्यास निळी, लाल, राखडी, पिवळी अशा रंगाची प्लास्टीकची गोणी मिळुन आली असुन तिचे तोंड हे प्लास्टीक दोरीने बांधलेले असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरुडे यांनी ते खोलण्यास सांगितले असता त्याने ती गोनी खोलली असता गोनीमध्ये खाकी कागदामध्ये एकुण 20 पॅक केलेले पॅकेट दिसुन आले.अंमली पदार्थाची आणलेल्या ड्रग्ज डिटेक्शन किटमध्ये तपासणी प्रकिया उपलब्ध नसल्याने पोलीसांच्या अनुभवावरून वनस्पतीचा रंग, गंध, स्पर्श व उग्र वासावरून तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याची पोलिसांना खात्री झाली होती.रोहीतकुमार विजयकुमार पटेल यांचे ताब्यात कारसह 42 किलो ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा 14 लाख 35 किंमतीचा व 5 लाख
75 हजार किंमतीची कार जप्त केले असून, आरोपींच्या विरोधात चितळसर पोलीस ठाणे एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क),20 (ब) ii (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सिध्देश दत्तात्रय शिंदे यांचेविरूध्द नारायणगाव पोलीस स्टेशन, पुणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिमाण करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (क) प्रमाणे गुन्हा यापुर्वी दाखल आहे.

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -5 प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल वरूडे, यांचे मार्गदर्शनाखाली चितळसर पोलीस ठाणेचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे, पोलीस उपनिरीक्षक पंकज लहाणे, पोलीस उपनिरीक्षक विजय हिंगे, पोलीस हवालदार सुरेश पाटील, अभिजीत कलगुटकर, पोहवा /६६४९ अभिषेक सावंत, संतोष चौगुले, प्रमोद तायडे, भरत घाटगे, स्वप्निल शिंदे,रविंद्र रावते, पोलीस शिपाई दिगंबर पगारे,किशोर साळुंखे,अभिजीत शिवणकर, महिला पोलीस शिपाई रेश्मा शिंदे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0