महाराष्ट्र
Mahakumbha Mela Live Update : महाकुंभ 2025 साठी, सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेला स्नान झाले. 1.50 कोटींहून अधिक भाविकांनी गंगा स्नान केले.
helicopter View Mahakumbha Mela : सोमवारी महाकुंभासाठी आलेल्या भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांच्या भक्तीचे आकाशातून फुलांचा वर्षाव करत केले स्वागत करण्यात आले.प्रयागराज महाकुंभासाठी आलेल्या भाविकांवर यूपीच्या योगी सरकारने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली आहे. सायंकाळी 4.05 वाजता हेलिकॉप्टर संगम परिसरात पोहोचले आणि घाट ते आखाडा या रस्त्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
त्यामुळे महाकुंभ परिसरात उपस्थित भाविक आनंदी दिसत होते. 10 मिनिटांनंतर पुन्हा फुलांचा वर्षाव करण्यात आला.महाकुंभातील पहिले स्नान 14 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
सीएम योगी यांनीही फ्लॉवर शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले की, हा श्रद्धेचा सलाम, श्रद्धेचा सलाम, सनातनचा जयघोष, महाकुंभाचा जयघोष… हर हर गंगे!
फोटो गॅलरी