Mumbai Rape Case : काम मिळवून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक!
Mumbai Police Latest Crime News : मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने मुलीला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने सोबत नेले आणि तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुंबई :- मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत Mankurd Police Station अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. Mumbai Rape Case मुलीच्या आईच्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सागर लक्ष्मण कापसेकर याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला काम मिळवून देण्याच्या नावाखाली सोबत नेले आणि तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला घटनेनंतर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांपासून पळून जाण्यासाठी आरोपी मोबाईल नंबर बदलत होता, पोलिसांच्या तांत्रिकतेच्या आधारे आरोपीला नवी मुंबईतील घणसोली गावातून अटक करण्यात आली आहे.