ठाणे: नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री बंदी : पोलिसांकडून 9 ठिकाणी छापेमारी
Thane Police Raid On Illegal Nylon Manja Seeling : मकरसंक्रात सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते.
ठाणे :- मकरसंक्रात सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. Thane Illegal Nylon Manja Seeling मात्र नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व नागरिकांना अनेकदा गंभीर इजा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. प्रकार रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी नायलॉन मांजाची घाऊक व किरकोळ बाजारात विक्री करण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्यात नायलॉन मांजाचा वापर होऊ नये, यासाठी 112 हेल्पलाईन चालू केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ठाणे पोलीस Thane Police आयुक्तालयाच्या हद्दीत छापे वारी करून एकूण नऊ गुन्हे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 5,15 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
मकरसंक्रातीमध्ये नायलॉन मांजामुळे घडणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असते. बहुतांशी प्रकरणांमध्ये हा मांजा नागरिकांच्या गळ्याचाच वेध घेत असल्याने यात घातक इजा होण्यासह जीव गमवावा लागलेल्या नागरिकांचीही संख्या मोठी आहे. पोलीस उप आयुक्त विशेष शाखा ठाणे यांच्या आदेशाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशाप्रकारे मांजा तयार करणे, विकणे, वापर करणे यावर मनाई करण्यात आले आहे.