MLA Ravindra Chavan : माजी मंत्री डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष!
MLA Ravindra Chavan : भाजपने रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार असून त्यांनी विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
मुंबई :- महायुतीचे सरकार स्थापन होऊन अवघ्या महिनाभरात भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांची महाराष्ट्र युनिटच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण MLA Ravindra Chavan यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत. मराठा कार्ड खेळताना भाजपने हे मोठे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेनंतर भाजपने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पक्षाने रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्रातील संघटना निवडणुकीचे प्रभारीही केले होते. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले.त्यांनी लिहिले, “रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्राच्या कार्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीला नक्कीच मोठी चालना मिळेल, असा मला विश्वास आहे.”
54 वर्षीय रवींद्र चव्हाण हे कल्याणचे असून सलग चार वेळा ते डोबिंवलीचे आमदार आहेत. यापूर्वीच्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय त्यांनी आजवर सार्वजनिक बांधकाम विभागासह अनेक मोठी खाती सांभाळली आहेत.2005 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर ते स्थायी समितीचे सदस्यही झाले. त्यानंतर 2009 साली आमदार म्हणून निवडून येऊन पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.