Nashik Truck Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि पिकअपच्या धडकेत 8 ठार, अनेक जखमी
Nashik Truck Accident Latest News : नाशिकमधील द्वारका उड्डाणपुलावर ट्रक आणि पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक :- नाशिकमध्ये मोठा अपघात झाल्याची बातमी आहे. Nashik Truck Accident नाशिकमधील द्वारका उड्डाणपुलावर ट्रक आणि पिकअप वाहनाच्या धडकेत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. ट्रक लोखंडाने भरल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी (12 जानेवारी) सायंकाळी 7.30 वाजता अय्यप्पा मंदिराजवळ हा अपघात झाला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, टेम्पोमध्ये 16 प्रवासी होते जे धार्मिक कार्यक्रम आटोपून सिडकोच्या दिशेने जात होते. टेम्पो चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो लोखंडी रॉडला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, काही जणांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी सहसा गर्दी असते. अशा स्थितीत अपघाताची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिक व ये-जा करणाऱ्यांच्या मदतीने अपघातातील जखमींना बाहेर काढले व सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.
काही जखमींवर जिल्हा रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.