HSC Exam : महाराष्ट्र बोर्डाने 12वीचे हॉल तिकीट जारी केले, येथून डाउनलोड करा
HSC Time Table 2025 Download : बोर्डाने इयत्ता 12वी परीक्षेची प्रवेशपत्रे जारी केली आहेत. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षेच्या तारखा आणि वेबसाइटसाठी
मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 12वीचे प्रवेशपत्र जारी केले आहे. 12th HSC Board Exam उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेची हॉल तिकिटे आता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.www.mahahsscboard.in येथे उपलब्ध आहे. विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळेच्या पोर्टलवर आवश्यक तपशील भरून हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात आणि त्याची प्रिंटआऊट घेऊन विद्यार्थ्यांना वितरित केली जाऊ शकते.
बोर्डाने या संदर्भात नोटीस जारी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 10 जानेवारी 2025 पासून, सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना 12 वी हॉल तिकीट वितरित केले जातील.कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांनी संबंधित मंडळाशी संपर्क साधावा, असेही मंडळाने म्हटले आहे.