बीड : 90 हजारांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा

Beed Latest Bribe News : बीड मधील माध्यमिक शिक्षक विभाग जिल्हा परिषद येथील जिल्हा शिक्षक अधिकारी,वरिष्ठ लिपिक संतोष शंकरराव कुकडे (51 वय) यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले
बीड :- सेवानिवृत्तीचा प्रस्ताव तयार करून महालेखापाल, नागपूर यांना पाठवण्यासाठी बीड मधील शिक्षक अधिकारी कार्यालय माध्यमिक, जिल्हा परिषद येथील वरिष्ठ लिपिक संतोष शंकरराव कुकडे (51 वय) यांना चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड युनिटने कारवाई ACB Beed Unit करत लाचखोर वरिष्ठ लिपिकाला ताब्यात घेतले आहे. सेवानिवृत्तीचा प्रस्ताव तयार करून महालेखापाल नागपूर यांना पाठवण्यासाठी संतोष कुकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. 1 Lakh Bribe तडजोडी अंती 90 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधकविभागाच्या छत्रपती संभाजीनगर पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंंधक कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला.
यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा सेवा निवृत्ती वेतन मंजुर करणे बाबतचा प्रस्ताव बीड येथील कार्यालयात मुख्याध्यापक पारनेर महाराज विद्यालय यांनी 23 ऑक्टोबर 24 रोजी दाखल केला होता . सेवा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करुण महालेखापाल ,नागपूर यांना पाठवण्यासाठी वरिष्ठ लिपिक संतोष कुकडे यांनी एक लाख रुपयांची मागणी तक्रारदार यांना केली होती. तडजोड अंती 90 हजार रुपये देण्याचे ठरले . त्यापैकी 40 हजार रुपये तक्रारदार यांनी यापुर्वीच दिले होते . उर्वरित लाच रक्कम देण्याची तक्रारदार यांना ईच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र. वि .बीड येथे आज (8 जानेवारी) रोजी तक्रार दिली होती . यावरुन लाच मागणी पडताळणी केली असता वरिष्ठ लिपिक कुडके यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना त्यांचे कामाचा मोबदला म्हणुन 90 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले . तसेच या पुर्वी 40 हजार रुपये स्विकारल्याचे मान्य केले . त्यावरुन वरिष्ठ लिपिक यांच्या कार्यालयात सापळा रचून कारवाई केली असता तक्रारदार यांचेकडून वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यांनी पंचासमक्ष लाच रक्कम 50 हजार रुपये स्वीकारताच त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले . वरिष्ठ लिपिक कुडके यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरुद्ध शिवाजी नगर, पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर. मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शंकर शिंदे पोलीस उप अधिक्षक , ला. प्र.वि . बीड आणि सापळा पथक – सहाय्यक फौजदार सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष राठोड, भारत गारदे, अविनाश गवळी , गणेश मेहेत्रे ,श्रीराम गिराम ,अमोल खरसाडे .ला. प्र. वि. बीड यांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.