
Maharashtra IAS Transfer List : आयएएस दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचा सपाटा सुरूच आहे.एन नवीन सोना एकनाथ शिंदेंचे प्रधान सचिव
मुंबई :- नवीन सरकार स्थापन झाल्यापासून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा अद्यापही संपलेला नाही.राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून एन.नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव असतील. Maharashtra IAS Transfer List तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त असतील. गेल्याच आठवड्यातही राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. आता 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोणत्या आयएएस अधिकाऱ्याच्या कुठे बदलल्या झाल्या?
1.अतुल पाटणे (IAS:RR:1999) आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यांची सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2.ऋचा बागला (IAS:RR:1999) यांना प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
3.अंशु सिन्हा (IAS:RR:1999) यांची प्रधान सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4.एन.नवीन सोना (IAS:RR:2000) प्रधान सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची उपमुख्यमंत्री (माननीय श्री एकनाथ शिंदे), मंत्रालय, मुंबई यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5.डॉ. रामास्वामी एन. (IAS:RR:2004) सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (ADF) कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
6.वीरेंद्र सिंह (IAS:RR:2006) सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
7.प्रदीप पी. (IAS:RR:2009) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.