मुंबई

Raigad Accident News : रायगड-मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 ठार, 2 जखमी

Raigad Veer station Accident News : मुंबई गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्थानकाजवळ टोइंग व्हॅनची स्कॉर्पिओला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला, तर दोन जण जखमी झाले.

पनवेल :- रायगड-मुंबई गोवा महामार्गावर शुक्रवारी (3 जानेवारी) भीषण अपघात झाला. Raigad veer Staion Accident News या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मुंबई गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्थानकाजवळ घडला, जिथे टोइंग व्हॅन स्कॉर्पिओला धडकली.

त्यानुसार या अपघातानंतर जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्कॉर्पिओमधील डिझेल संपताच चालकाने स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला उभी केली आणि चिपळूणहून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टोईंग व्हॅनने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली.अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टोईंग व्हॅनच्या चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टोईंग व्हॅनच्या चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. आरोपी चालकाला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0