महाराष्ट्र मिरर न्यूज नेटवर्क
पनवेल : कोन गावातील निसर्ग गार्डन हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. Panvel Illegal Hukkah Parlour त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी धाड टाकली.
त्यावेळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर चार ते पाच इसम हुक्का व धूम्रपान करताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी ५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिवराज गायकवाड, अजित ठाकूर व हरीराम साकेत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Panvel Latest Crime News