Mumbai Illegal Bangladeshi Migrant : बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला ॲन्टॉप हिल मुंबईतून अटक
Mumbai Illegal Bangladeshi Migrants Arrested : गेल्या अनेक वर्षापासून बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाला मुंबई ॲन्टॉपहिलच्या दहशतवादी विरोधी पथकानं अटक केली आहे.
मुंबई :- एका बांगलादेशी नागरिकाला भारतात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या गुन्ह्यात, ॲन्टॉपहिलच्या दहशतवादी विरोधी पथकानं भारत झोपडपट्टी सेवा संघ महात्मा गांधी नगर येथून बेड्या ठोकल्या. Illegal Bangladeshi Migrant जमारुल युसूफ शेख (37 वय) असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून तो प्लंबर चे व्यवसाय करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना भाषाशैली वरून आणि तसेच हावभाव वरून जमारुल शेख बंगाली भाषिक असल्याचा दाट संशय आला. पोलिसांनी त्याच्याकडे त्याच्या नावाची चौकशी केली असता भारतात येण्यासाठी आवश्यक्य असलेल्या कागदपत्राची पाहणी केली असता तो अवैधरित्या भारतात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी जमारुल शेख याच्या विरोधात ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे नियम 3(A) सह 6(A) पारपत्र (भारतात प्रवेश) 1950 सह परिच्छेद 3(1) परकीय नागरीक आदेश 1948 सह 14 परकीय नागरिक कायदा 1946 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती,पोलीस सह आयुक्त का व सु सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ -4, रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सायन विभाग, शैलेंद्र धिवर, श्री. सुधाकर ढाणे वरीष्ठ पोलीस ठाणे ॲन्टॉपहिल पोलीस ठाणे याच्या मार्गदशानाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल बच्छाव दहशतवादी विरोधी कक्ष पोलीस शिपाई चव्हाण,सनगर,साठे यांनी यशस्वीपणे पुर्ण केली आहे.