Mumbai Police Crime Branch : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 1 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह 2 तस्करांना अटक
Mumbai Police Crime Branch Take Action On Drug Trafficking: मुंबई पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तो हे ड्रग्ज कुठून आणि कोणाला पुरवत होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलिसांनी सुरू केला आहे.
मुंबई :- मुंबई गुन्हे शाखेच्या Mumbai Crime Branch Ghatkopar Unit अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने मुंबईतील गोरेगाव आरे कॉलनी परिसरातून 288 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 1 कोटी 15 लाख रुपये आहे. यासोबतच गुन्हे शाखेने दोन ड्रग्ज तस्करांनाही अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तो हे ड्रग्ज कुठून आणि कोणाला पुरवत होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (अति. कार्यभार), अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले, यांचे नेतृत्वाखाली त्यांचे अंपवि. कक्ष घाटकोपर पथक यांनी केली आहे