क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : सराईत गुन्हेगाराकडून दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतूस हस्तगत

Pune Police Seized Gun From Criminal: विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 06 गंभीर गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

पुणे :- नांदेड सिटी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि 1 जिवंत काडतूस असा 70 हजार 500 रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.साजन विनोद शहा (वय 19 वर्षे रा. धायरीगाव, भैरवनाथ मंदिरा जवळ पोकळे क्रिस्टल बिल्डीग धायरी पुणे ) ,कुणाल शिवाजी पुरी (वय 18वर्ष11 महिने) असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. आरोपी साजन शहा याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये Pune Police News एकूण 6 खुणाचा प्रयत्न, दरोडा, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडला. Pune Police Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेंडे यांच्या बातमीदारामार्फत सराईत गुन्हेगार साजन शहा आणि कुणाल पुरी हे गावठी पिस्तूल घेऊन दोघे अंबाबाईदरा धायरी पुणे येथे गावठी पिस्तूल Gavathi Pistol विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 पुणे, संभाजी कदम,सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उप निरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजु वेंगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0