Virar Crime News : गहाळ झालेले 26 मोबाईल, 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, सात वाहने तक्रारदार नागरिकांना परत ; विरार पोलिसांची कामगिरी
•हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल, चोरीमध्ये सोन्याचे दागिने, सात वाहने तक्रारदारांचे परत मिळून देण्यात विरार पोलिसांना यश
विरार :- विरार पोलिसांनी दमदारी कामगिरी करत तब्बल 23 लाख 96 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यात यश आले आहे.हरविलेले तसेच गहाळ झालेले 26 मोबाईल, घरफोडीच्या दरम्यान चोरलेले सोन्याचे 100 ग्रॅम दागिने आणि सात वाहने परत मिळण्याची शाश्वती कमी असताना विरार पोलिसांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.
विरार पोलिसांनी चोरीच्या, जबरी चोरीच्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्याने तपास घेऊन 11 गुन्हे उघडकीस आणले आहे. यामध्ये चार लाख 96 हजार 116 रुपये किंमतीचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सात वाहने हस्तगत करण्यात आले आहे. तसेच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हरवलेले चोरीला गेलेले वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 26 मोबाईल फोनचा शोध घेण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, वाहने, आणि मोबाईल फोन असा ऐकून 23 लाख 96 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदार नागरिकांना हे मोबाईल, सोन्याचे दागिने, वाहने पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग बजरंग देसाई यांच्या हस्ते परत करण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
पोलीस पथक
मधुकर पांडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त जयंत बजबळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-2 बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे, प्रतापराव कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अमित ताड, पोलीस निरीक्षक (प्रशासन) गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधय, नितेश पाटील, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, पोलीस अंमलदार मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, प्रफुल सोनार, उत्कर्ष सोनावणे व मुद्देमाल कारकून लेख, महिला पोलीस अंमलदार गडकरी तसेच पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-3, विरार यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.