Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामध्ये खळबळ माजण्यासारखे काय? खासदार संजय राऊत
Sanjay Raut On Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : अजित पवार हा पक्ष नसून एक गट आहे, संजय राऊत
नवी दिल्ली :- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी काल नागपूरच्या अधिवेशनात हजेरी लावली तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यात त्या खळबळ माजण्यासारखे काही नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी आमंत्रणही दिले होते आणि शुभेच्छा ही घेतल्या होत्या असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावत अधिवेशनापूर्वी त्यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा दिल्या, त्यामध्ये खळबळ काय? असा प्रतिसावाल राहू त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की हिंदुत्वाच्या पासून आम्ही फारकत घेतली असल्याचा आरोप करणाऱ्यांची मला कीव येते आहे. बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले झाले, हनुमान मंदिर चा प्रश्न असो किंवा सावरकरांचा प्रश्न असो अशा प्रत्येक वेळी सर्वात पहिले ठाकरेचे शिवसेना पुढे येते असे संजय राऊत म्हणाले आहे.
संजय राऊत अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, अजित पवार त्यांच्या पक्षाला कोणतीही विचारधारा नाही तो पक्ष नसून एक गट आहे. अजित पवार यांच्या पक्षाला अमित शहा यांनी मान्यता दिली आहे तरीदेखील तो एक गटच आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार यांचा खरा पक्ष असून त्यांची विचारधारा आहे असे देखील ते म्हणाले. तसेच खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे. तर राष्ट्रवादी खरी विचारधारा आणि पक्ष म्हणून शरद पवार यांचाच असल्याचे संजय राऊत म्हणाले आहे.