क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

भिवंडी : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; दोन लाखांचे 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त

Bhiwandi Police Arrested Mobile Robber : मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गुन्हे शाखा कक्ष-2 भिवंडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांचे 11 मोबाईल जप्त करण्यात आले.

भिवंडी :- भिवंडी‌ शहरात मोबाईल Bhiwandi Robbery News चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांनी Bhiwandi Crime Branch 2 Police एका सराईत चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून दीड लाखांहून अधिक किंमतीचे 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी माहिती दिली आहे. तसेच आरोपींच्या वरती असलेले एकूण 12 गुन्हे पोलिसांना उघडकीस आणण्यात यश आले आहे.शेरआली उर्फ पिल्या इमाम फकीर (वय 22 ,रा.गणेश लॉन्ड्री च्या गल्लीत, गायत्रीनगर पोलीस चौकी समोर, भिवंडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा कक्ष-2 भिवंडी येथे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार हा रामनगर, डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटर सायकल आणि मोबाईल विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली आहे. शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर या आरोपीवर भिवंडी, शांतीनगर, निजामपुरा, खडकपाडा, भोईवाडा या पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी आणि बाईक चोरीचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपीचे झडती घेतली असता त्याच्याजवळ एक मोबाईल आढळून आला तसेच त्याच्याकडे बर्गमन कंपनीची मोटरसायकल आढळून आली त्यावर त्यांचे नंबर प्लेट ही नव्हती. तसेच, आरोपीने मोटरसायकलची डिक्की उघडल्यास पोलिसांना त्यांच्याकडे चोरीचे जवळपास 11 मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण दोन लाख 45 हजार 199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीवर 14 गुन्हे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले,पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव,सहाय्यक पोलीस आयुक्त शोध -1 (गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटक 2, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, पोलीस हवालदार सचिन जाधव, पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस शिपाई भावेश खरात, विजय कुंभार,नितीन बैसाणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0