क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

ठाणे : महिलेला लुटणारी टोळी अटकेत

Thane Police News : स्थानिक विशेष गुन्हे विभागाने मुंबई नाशिक महामार्गावर महिलेला हेरून त्यांचे विदेशी चलन आणि भारतीय चलन अशी एकूण 12.29 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली.

ठाणे :- स्थानिक विशेष गुन्हे विभागाने Thane Crime Branch मुंबई नाशिक महामार्गावर Mumbai Nashik Highway Women Robbery महिलेला आणि कॅब चालकाला हेरून तिचे रोकड रक्कम विदेशी आणि भारतीय चलन लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. टोळीतील सात जणांना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेले ईरटीका कार, 2 मोटर सायकल, गावठी कट्टा, 1 जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन असा एकूण 21.97 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबरच्या रात्रीच्या सुमारास सुनिता सिल्वरराज पिल्ले (45 वय रा. उल्हासनगर 4) या मुंबईला जात असताना नाशिक मुंबई हायवेवरील मुंबईच्या दिशेने कॅडबरी जंक्शन जवळील एका ठिकाणी “पुलिस और कस्टम पीछे से आ रहे हैं, आप गाड़ी रोको” अशी बतावणी करत,”कार्यालय कल आपकी गाड़ी बंद करें”अशी धमकी देत आरोपींनी महिलेकडील जबरदस्ती पन्नास हजार रुपयांचे सौदी रियाल (भारतीय चलन 11.29 लाख रुपये) आणि एक लाख रुपये भारतीय चलन असे एकूण 12 लाख 29 हजार रुपयाची लूट केली होती. याप्रकरणी पोलिसांनी राबोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 309(6),3(5),49 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी खंडणी विरोधी पथकाकडून विशेष पथक तयार करून तसेच राबोडी पोलीस ठाण्याचे Rabodi Police Station खंडणी विरोधी पथक असे समांतर तपासणी करून आरोपींना गोपनीय बातमीदारामार्फत तसेच सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे एकूण सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सात आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करत आहे.

आरोपींचे नाव
1) मोहीत हेमंत हिंदुजा,( वय 19 , उल्हासनगर 3. जि. ठाणे),

2) वरूण नरेश होटवानी, (वय 20 उल्हासनगर-3, जि. ठाणे)

3) रोहन सतिश रेडकर उर्फ बाबु, (रा. वय19 उल्हासनगर -3, जि. ठाणे.)

4) स्वप्नील दिलीप ससाणे उर्फ बाबुराव (वय 22 वर्षे, धंदा बेकार, रा. बरेक नं. 30, रूम नं. 2, जयलक्ष्मी सोसायटी समोर, एसईएस शाळेचे पाठीमागे, उल्हासनगर 1, जि. ठाणे.)

5) अन्वर सुवानी शेख,( उल्हासनगर-1, जि. ठाणे )

6) निता विष्णु मनुजा उर्फ भक्ती, (वय 40, कल्याण पश्चिम जि. ठाणे)

7) विधीसंघर्षित बालक

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक शेखर बागडे, सहा‌य्यक पोलीस आयुक्त शोध 2 (गुन्हे) राजकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे,श्रीकृष्ण गोरे, भुषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, संदिप भोसले, पोलीस हवालदार दिपक गडगे, आशिष ठाकुर, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, पोलीस नाईक रविंद्र हासे, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, तानाजी पाटील, संतोष वायकर, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0