Panvel News : त्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर जेष्ठ पत्रकार किरण बाथम यांची फेरनिवड
पनवेल :- रायगड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार किरण बाथम यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी फेरनिवड झाल्याची घोषणा सोलापूर येथे प्रदेश कार्यकारिणी निवडणूक प्रसंगी केल्याने रायगड, पनवेल, नवी मुंबईत पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पत्रकार सुरक्षा समितीवतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती,राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना,घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी, राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलने, उपोषणे,निवेदने.त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
किरण बाथम यांनी यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी काम पाहिलं असून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी संदर्भात ते नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत पत्रकार सुरक्षा समिती नूतन पदाधिकारी 2025 साठी किरण बाथम यांची प्रदेश उपाध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली.
1987 पासून वृत्तपत्र पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत किरण बाथम यांची संघटनात्मक चळवळ मुरुड तालुका पत्रकार संघ स्थापना करून झाली. नंतर त्यांनी एस. एम. देशमुख यांच्यासह रायगड जिल्हा प्रेस क्लबमध्ये रायगड जिल्ह्यात झंजावात उभारला होता. अनेक उपक्रम, पत्रकारांवरचे धमकी, हल्ला प्रकरणात धावणाऱ्या किरण बाथम यांना नंतर रायगड जिल्हा अध्यक्ष करण्यात आले.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आंदोलनमध्ये त्यांनी झोकून काम केले.
लोकसत्ता, सामना, नवाकाळ, मुंबई-सकाळ आदी राज्यस्तरावर अनेक वृतपत्र त्यांनी अक्षरशः गाजवली. सॅटेलाईट चॅनल सुरु झाल्यावर त्यांनी सहारा-समय वृत्तवाहिनी मधून रायगड, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी पर्यंत असंख्य विषयांवर स्पॉट पत्रकारिता केली.आजतक, इंडिया टीव्ही असे हिंदी चॅनल तसेच आयबीएन, जय महाराष्ट्र, साम टीव्ही असे मराठी चॅनलमध्ये त्यांनी काम केले.पत्रकार सुरक्षा समितीमध्ये त्यांना नव्या कार्यकारिणीच्या संघटनात्मक बांधणीत त्यांना पुन्हा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी किरण बाथम यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत 1987 पासून वृत्तपत्र पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत किरण बाथम यांची संघटनात्मक चळवळ मुरुड तालुका पत्रकार संघ स्थापना करून झाली. नंतर त्यांनी एस. एम. देशमुख यांच्यासह रायगड जिल्हा प्रेस क्लबमध्ये रायगड जिल्ह्यात झंजावात उभारला होता. अनेक उपक्रम, पत्रकारांवरचे धमकी, हल्ला प्रकरणात धावणाऱ्या किरण बाथम यांना नंतर रायगड जिल्हा अध्यक्ष करण्यात आले.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आंदोलनमध्ये त्यांनी झोकून काम केले.