[ मंञिपदाची कापाकापी जोमात ; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ]
दौंड प्रतिनिधी, ता. १६ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नवीन मंञिमंडळात विक्रमी मताधिक्यासह तिसऱ्यांदा विजयी झाल्याने मंञिपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या राहुल कुल Rahul Kul यांना मंञिपदाने हुलकावणी दिली आहे. मंञिपदासाठी आता दौंड मतदारसंघाला अडीच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नागपूर येथे १६ डिसेंबर २०२४ रोजी राज्य मंञिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात दौंडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांना मंञिपदाची मोठी अपेक्षा होती. पण मंञिमंडळात स्थान मिळू न शकल्यामुळे त्यांच्या पदरी तुर्त तरी निराशा आली आहे. कुल यांचे समर्थक देखील नाराज झाले आहेत. तब्बल एक लाख १३,८८९ मतांच्या फरकाने विजयी होऊन सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकत हॅट्ट्रिक केली. राहुल कुल यांना यावेळी मंञिपदावर बढती मिळणार, अशी शक्यता राजकीय अभ्यासकांना वाटत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुल यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांची मंञिमंडळात वर्णी लागेल, असे मानले जात होते. दहा वर्षांनंतर तालुक्यातून मंञिपदाची संधी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत होता. मंञिपद मिळाल्यानंतर दौंडच्या विकासाचा वेग अधिक वाढेल, असे अपेक्षा होती. मंञिमंडळ विस्तारात कुल यांचे नाव न आल्याने दौंडकरांच्या पदरी निराशा पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवंड येथे जाहीर सभेत तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला मंञिपद देतो असे आश्वासन दिले होते. माञ कोठेतरी माशी शिंकली व त्यांना पुढीलवेळी मंञीपदी वर्णी लावण्याचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली. मंञिमंडळ विस्तारात पुन्हा एकदा निराशा झाल्याने कुल समर्थक संतप्त आहेत. पुढील मंञिमंडळ विस्तारात स्थान निश्चित असल्याचे सांगत कुल समर्थकांची समजूत काढण्यात येत आहे.
पक्षाने मला न मागता भरपूर दिले आहे. माञ जनतेची व कार्यकर्त्यांची मंञिपदाची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. मंञिमंडळ विस्तारात माझा समावेश का झाला नाही, याचे कारण माहीत नाही. मी कोणावर आरोप करणार नाही. माञ, मला मंञीपद द्यायचे की नाही, याचा पक्षनेतेचे निर्णय घेतील.
— आमदार राहुल कुल