Thane Police News : एमडी अंमली पदार्थ आणि नशेसाठी कफ सिरपचा वापर, पोलिसांकडून दोन कारवाई
Thane Police Seized MD Drugs : मुंब्रामध्ये 7.43 लाखांची एमडी अंमली पावडर आणि 3.63 लाखांचे नशेसाठी कप सिरप औषधांवर मोठी पोलिसांची कारवाई
ठाणे :- राज्यात मोठ्या प्रमाणावर तापमानामध्ये घट होत असल्याने सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. Thane Drugs News यामुळे औषधाच्या दुकानातील कफ सिरपचा खपही वाढू लागला आहे. मात्र हा खप वाढण्यामागे केवळ सर्दी-खोकला हेच कारण नाही. तर कफ सिरपचा सर्वाधिक वापर नशेसाठी होत असल्याने त्यांची विक्री वाढली आहे. शिळडायघर पोलिसांनी Thane Shildieghar Police Station कारवाई करत तब्बल 720 कोडीनयुक्त कफ सिरप औषधाच्या बाटल्या बाळगणाऱ्या एकाला मुंबईच्या कुल्हड चहा, वडापाव सेंटर कडुन-गणेश खिंडीमार्गे कल्याण फाटयाकडे जाणारे रोडवर, डायघर, ठाणे येथे एका व्यक्तीला म्हणजेच नवाज शमशद्दीन पावले, (रा. मुंब्रा, ठाणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध शिळ डायघर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 22 (क) सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 क, 18 अ, शिक्षा कलम 27 (ब) व 28 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यात त्यास अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपी याची दिनांक 17 डिसेंबर रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. जप्त बॉटल कोठुन मिळविल्या? याव्यतिरीक्त आणखी साठा आहे का? याबाबत तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांनी खर्डीगाव येथील तलाव, खडर्डीकडुन दिवाकडे जाणारे रोडवर, मुंब्रा, या ठिकाणी मोहम्मद अब्दुल रेहमान सय्यद उर्फ नॉडी, (रा. खोणीगांव) हा त्याच्या जवळ एकुण 60.3 ग्रॅम वजनाचा ‘एम.डी. Mephedron’ हा अंमली पदार्थ विक्रीकरीता बाळगला असताना मिळून आला होता.मुंब्रा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याची 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. अटक आरोपी याने ‘एम.डी. Mephedron’ हा अंमली पदार्थ कोठुन मिळविल्या ? याव्यतिरीक्त आणखी साठा आहे का? याबाबत तपास सुरू आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश गावित, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, नितीन भोसले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, पोलीस हवालदार हरिश तावडे, अमोल देसाई, अभिजित मोरे, विक्रांत पालांडे, हेमंत महाले, महेश साबळे, संदीप भांगरे, प्रशांत राणे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, पोलीस अंमलदार अनुप राक्षे यांनी केली आहे.