मुंबई
Trending

Maharashtra News : ओबीसी नेत्यांचा अजित पवारसह महायुतीला इशारा ; छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गटात नाराजीचा सूर

OBC Leader Babanrao Rao Madne On Maharashtra Sarkar : राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी व्यक्त केली खंत, ओबीसी नेत्यांना महायुतीच्या मंत्रिमंडळ स्थान नाही, छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना मंत्रीपदापासून दूर

मुंबई :- महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) रोजी नागपूर मध्ये संपन्न झाला माहितीने यंदा फ्रेश चेहरे म्हणून अनेक नवीन मंत्रांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान दिल्याने अनेक मंत्रिमंडळाचे दावेदार आणि ज्येष्ठ सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अनेक ओबीसी नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांचं घरचा आहेर दिला आहे.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी व्यक्त केली खंत

ते म्हणाले की,छगनराव भुजबळ यांना मंत्री पद न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून बाहेर पडून अजितदादा पवार यांनी भाजप बरोबर जावून महायुती मध्ये सामिल झाले यावेळी अजितदादा पवार यांच्या बरोबर जावून त्यांना भुजबळ ख-या अर्थाने साथ दिली अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर पूर्ण ताकदीनिशी भुजबळ उभे राहिले.

मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष सुरू असताना मराठा समाजाच्या आरक्षणला कुठेही छगन भुजबळ साहेबांनी विरोध केला नव्हता. तरी जाणून बुजून मनोज जरागेच्या माध्यमातून भुजबळांना टार्गेट केले जात होते .अशा कठिण परिस्थितीत राज्यातील वातावरण जाणून बुजून महायुतीच्या विरोधात खोटा प्रचार प्रसार करुन केले जात असतान छगन भुजबळांच्या मुळे ओबीसी समाज संपूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या बाजूने उभा राहिला. तसेच महायुतीच्या सरकारची भूमिका कशी ओबीसीच्या बाजूने आहे.हे ठामपणे पटवून देण्यासाठी ज्या दोन नेत्यांनी संघर्ष केला.यामध्ये सिंहांचा वाटा जर‌ कोणाचा असेल तो छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांचा होता. छगन भुजबळ आणि
धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे धनगर /ओबीसी समाजात निश्चित खंत व्यक्त केली जात आहे.या दोन्ही नेत्यांना डावलले गेल्याने धनगर ओबीसी समाजात नाराजगी आहे. असे प्रतिक्रिया बबनराव मदने यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0