क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Murder News : 2018 मध्ये खुनाच्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Thane Murder News : न्यायालयाचा निकाल, शुल्लक कारणावरून खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप!

ठाणे :- 2018 मध्ये शुल्लक कारणावरून नौपाडा पोलीस ठाण्याच्या Nawpada Police Station हद्दीत खून करण्यात आला होता. प्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून खुनाच्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेत आरोपी आकाश कुमार पवार (25 वय) मयत प्राची विकास झाडे (21 वय) हिच्यावर शुल्लक कारणाने धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले होते. Thane Murder याप्रकरणी आरोपी याच्या विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 302,341 भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला आता जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.

न्यायाधीश अग्रवाल ,ठाणे जिल्हा व सत्र यांनी खुनाच्या गुन्हयातील आरोपी आकाशकुमार पवार याला सीआरपीसी 235 (2) सह भा.द.वि. कलम 302,341 भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे प्रमाणे दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

खुनाच्या गुन्हयाच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता लाडवांजरी, तत्कालीन तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर, पोलीस हवालदार‌ लोहार,राठोड,म्हापुणकर,वीर, गोगावले, पोलीस शिपाई सिंग सर्व
नौपाडा पोलीस ठाणे यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले व त्यामुळे गुन्हयातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आल्यामुळे उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस दलात व समाजातील सर्व स्तरातुन पोलीसांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0