Nalasopara Crime News : हॉटेलमधून पाच बाल कामगारांची सुटका
•हॉटेल बिस्मिल्ला आणि झमझम हॉटेल,आचोळे रोडवरील हॉटेलवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत पाच बाल कामगारांची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नालासोपारा :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या आणि कामगार विभागाच्या उपायुक्त यांनी कारवाई करत अचोळे रस्त्यावरील दोन हॉटेलवर कारवाई करत पोलिसांनी पाच बाल कामगारांची सुटका केली आहे. याप्रकरणी हॉटेल बिस्मिल्ला आणि हॉटेल झमझम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि दोघांविरुद्ध गुन्ही दाखल करण्यात आला आहे.
कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक गजानन जोंधळे यांनी तक्रार दिली. नालासोपारा येथील आचोळे पोलीस हद्दीत बिस्मिल्ला हॉटेलमध्ये बाल कामगारांकडून कमी वेतनात अधिक श्रम करून घेतले जात असल्याची माहिती कामगार उपायुक्त कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार दुकान निरीक्षक गजानन जोंधळे आणि गोपाळ वामन पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. अनैतिक मानवी पथकाच्या पोलिस निरीक्षक सौरभी पवार यांच्या पथकाने या पाच बालकामगारांचे सुटका करून दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध बाल अधिनियमन 75,79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबीन मोहीन खान (20 वय रा. नालासोपारा) यांच्या हॉटेल बिस्मिल्ला येथे तीन अल्पवयीन बालकामगार आढळून आल्याचे पोलिसांच्या तपासात सांगण्यात आले. तसेच हॉटेल झमझम येथील फैजलखान अबूतलहा मुस्लिम खान (21 वय रा.आचोळे, नालासोपारा) याच्या हॉटेलमधून पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकामगारांची सुटका केली आहे.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानची वाहतूक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार तसेच पोलीस हवालदार किणी, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार पागी, शिंदे, तिवले सर्व नेम, अनै. मा.पा. प्र. कक्ष नालासोपारा तसेच कामगार उपआयुक्त पालघर यांचे कार्यालयातील दुकाने निरीक्षक गजानन भाऊराव जोधंळे व सरकारी कामगार अधिकारी पालघर गोपाळ वामन पाटील यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.