Ambernath Bribe News : दहा हजाराची लाच घेताना सरपंच एसीबीच्या जाळ्यात
ACB Arrested Sarpanch For Taking Bribe : दहा हजाराची लाच घेणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
अंबरनाथ :- दहा हजाराची लाच 10 Thousand Bribe घेणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. Thane ACB Caught Bribe लाचखोर महिला सरपंच वनिता आढाव एसीबीने तब्येत घेतलेल्या महिला सरपंचाचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांनी वांगणी ता.अंबरनाथ जि.ठाणे येथे नविन घर खरेदी केलेले असून त्यानी घरपट्टी लावण्याकरिता लोकसेविका वनिता भूषण आढाव (सरपंच वांगणी ग्रामपंचायत ता. अंबरनाथ ) यांनी वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना वनिता भुषण आढाव सरपंच यांना लाच न देण्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी वनिता आढाव (सरपंच वांगणी ग्रामपंचायत) हया 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याबाबत ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे कार्यालयात लेखी तक्रार नोंदवली होती.
26 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई मध्ये वनिता आढाव यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींचे अवलंब करुन तक्रारदार हया लोकसेविका यांना लाचेची रक्कम देण्याकरीता गेल्या असता त्यांना काहीतरी संशय आल्याने यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही.
काल 11 डिसेंबरच्या दरम्यान रोजी लोकसेविका वनिता आढाव यांवेविरुध्द तक्रारदार याचे नविन घराची परपटट्टी लावण्याकरीता तडजोडी अंती दहा हजार लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविले असता एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
एसीबी पथक
शिवराज पाटील,पोलीस अधीधक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे,गजानन राठोड साो. अपर पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्यूरो ठाणे,संजय गोविलकर अपर पोलीस अधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्यूरो ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती अडसुरे, उपाधीक्षक ॲन्टी करप्शन ब्यूरो ठाणे यांच्या पथकाने कारवाई करत लाचखोर सरपंचांना अटक केली आहे.