Telegram Fraud News : टेलिग्रामच्या चॅनलवर गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक!
Nalasopara Cyber Police Arrested Telegram Task Fraudster : सायबर पोलीसांची यशस्वी कामगिरी ; फसवणुकीतील रकमेपैकी 1 लाख 93 हजार रुपये परत मिळवून देण्यास पोलीसांना यश
नालासोपारा :- गुंतवणूक, कूट चलनातील गुंतवणूक, टास्क गुंतवणुकीच्या Telegram Task Fraud नावाखाली सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. अशीच एक तक्रार सायबर पोलीसांच्या Cyber Police मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police Station हद्दीत घडली आहे. यामध्ये तक्रारदार याचे एक-दोन नाही तर तब्बल 1 लाख 93 हजार रुपयाची टेलिग्राम च्या गुंतवणुकीत फसवणूक झाली आहे. टेलिग्राम चॅनल वरील इन्व्हेस्टमेंट ॲप Telegram Channel Investment Fraud च्या नावाखाली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. सायबर पोलिसांनी जबर कारवाई करत फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यास पोलीसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे विज यांना टेलिग्राम चॅनल वर इन्व्हेस्टमेंट ॲप मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळेल असल्याची जाहिरात मिळाली होती. ॲप बद्दल कोणतीही पडताळणी न करता विज यांनी तब्बल 1 लाख 93 हजार रुपयांचे ऑनलाईन गुंतवणूक केली होती. परंतु कोणत्याही प्रकारे आर्थिक नफा तसेच गुंतवणूक केलेले पैसे न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची पाहणी करून त्यांनी आरोपी यांच्यासोबत केलेले आर्थिक व्यवहार या संबंधात पडताळणी करून पोलिसांनी एकूण फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम गोठविण्यात यश आले आहे. त्यापैकी पोलिसांनी पाठपुरावा करून 1 लाख 93 हजार तक्रारदाऱ्याच्या मूळ खात्यात परत देण्यात यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, कुणाल सावळे, शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे.