Vasai Crime News: चाकूने हल्ला करून लुटणाऱ्या आरोपींना अटक करण्यात वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश ,2 गुन्हे उघडकीस
Vasai Crime News : चोरलेली रोख रक्कम व मोबाइल हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वसई :- चाकूने हल्ला करून त्याला लुटणाऱ्या अटक वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. Vasai Crime News आरोपींनी अशा प्रकार आणखी गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. आरोपींविरोधात चोरी व हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरलेली रोख रक्कम व मोबाइल हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार,वालीव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 30 नोव्हेंबरच्या रात्री सुमारास फिर्यादी हे वसई पूर्व, पोलासो इंडस्ट्रीज जवळ, सातीचली येथील मस्जीद पासून आतल्या रोडने पायी चालत जात असताना तीन अनोळखी व्यक्तीने त्यांचेकडील मोटारसायकल वरुन फिर्यादी यांचे पाठीमागुन येवून फिर्यादीचे गळयाला चाकु लावुन धाक दाखवुन पॅन्टचे खिशातील मोबाईल फोन जबरीने खेचुन चोरी करुन पळून गेले म्हणुन वालीव पोलीस ठाणे कलम 309 (6), 3(5) भारतीय न्याय संहीता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने कौशल्यपूर्ण गुन्हयाचा तपास करुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी साहिल आयुब खाटीक, (वय 22 रा. रिलायवल ग्लोरी बिल्डींग, सातिवली, वसई पूर्व) यास अटक करुन वालीव पोलीस ठाणे गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीकडे चौकशी करुन वालीय पोलीस ठाण्याची 2 गुन्हे उघडकीस आणले आहे. गुन्हयातील जबरी चोरी केलेला एकुण मोबाईल फोन आणि रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ -2, उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, वालीय पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरखनाथ जैद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोवर्धन गिरवले, पोलीस हवालदार किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, पोलीस नाईक बाळु कुटे, पोलीस शिपाई विनायक राऊत, अभिजीत गढरी, सचिन लांडगे, केतन गोडसे यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.