Bangladeshi women arrested : भिवंडीच्या हनुमान टेकडी परिसरातून सहा बांगलादेशी महिलांना अटक
Bangladeshi women arrested : नुमान टेकडी हे भिवंडीतील रेड लाइट एरिया म्हणून प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणावर देहविक्री व्यवसाय
भिवंडी :- भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असणाऱ्या हनुमान टेकडी या रेड लाईट एरियात ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सहा बांगलादेशी महिलांची धरपकड करण्यात आली आहे.
बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्याचे सक्त आदेश ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने दुपारच्या सुमारास शहरातील हनुमान टेकडी येथील रेड लाईट एरियात छापेमारी केली. त्या ठिकाणच्या असंख्य खोल्यांमधील महिलांची झाडाझडती घेतली.पोलिसांच्या या कारवाईत सहा महिलांकडे भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे अधिक चौकशी केली असता त्या बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले. या महिलांना ताब्यात घेऊन स्थानिक भिवंडी शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस ठाण्याच्या ताब्यात महिलांना देण्यात आले आहे. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3,4, परकिय नागरीक कायदा कलम 1946 चे कलम 13,14 अ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यात सदर महिलांना अटक करण्यात आली आहे. तसेच महिला बांग्लादेशी आहेत हे माहित असुनही त्यांना घर भाडयाने दिले म्हणुन घर मालक यांच्यावर देखील परकीय नागरीक कायदा 1946 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
पोलीस पथक
अमरसिंग जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), धनाजी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडी व त्यांचे पथक यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.