Panvel News : रमझान शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश
पनवेल जितिन शेट्टी : राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षामध्ये तळोजा विभागातील असंख्य महिला भगिनींनी पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवा नेते रमझान शेख यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश सोहळा महिला प्रदेश सरचिटणीस सौ. भावनाताई घाणेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी तरन्नुम सय्यद समद अली यांना महिला जिल्हा कार्याध्यक्ष, शाहीन खान यांना महिला जिल्हा सरचिटणीस, रुक्सार शेख यांना महिला तलोजा शहर फेस २ अध्यक्ष पदांचा कारभार सुपूर्त करण्यात आला. यावेळी इतरही कार्यकर्त्यांना पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
यावेळी पनवेल महिला जिल्हाध्यक्ष सौ. राजश्रीताई कदम, खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष कृष्णा मर्डेकर , जिल्हा संघटक अमीर शाह मीरू, तुफेल खान जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग , खारघर शहर उपाध्यक्ष प्रवीण वारे , युवा कार्यकर्ते समीर शेख, मिराज शेख, इसराइल शेख आदी उपस्थित होते.